

Ichalkaranji Crime news
esakal
Ichalkaranji Murder Case : इचलकरंजीत कौटुंबिक वादातून पत्नीने झोपेत असलेल्या पतीच्या डोक्यात खलबत्ता घालून खून केल्याची गंभीर घटना आज पहाटे इचलकरंजीतील गावभाग परिसरात घडली. सागर दीपक बुरसे (वय ३५, रा. त्रिशूल चौक, गावभाग) असे मृताचे नाव आहे. खून केल्यानंतर पत्नी वैशाली हिने सकाळी स्वतः पोलिस ठाणे गाठून गुन्ह्याची कबुली दिल्याने हा प्रकार उघडकीस आला. सागर हे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कर्मचारी होते.