

Senior corporators observe
sakal
इचलकरंजी : महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत महायुतीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत महापौरपदी उदय धातुंडे आणि उपमहापौरपदी अनिल डाळ्या यांची बिनविरोध निवड केली. प्रशासकीय अडथळे, गोंधळ आणि विरोधाविना निवड प्रक्रिया पार पडली. मात्र, या निवड प्रक्रियेदरम्यान महायुतीतील ज्येष्ठ नगरसेवकांची उघड झालेली अंतर्गत नाराजी आणि असमाधान यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.