BJP Awade Halvankar dispute
esakal
इचलकरंजी : महापालिका आयुक्तांच्या बदलीच्या वादात पुन्हा भाजपमधील आवाडे व हाळवणकर गटात संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. आयुक्त पल्लवी पाटील यांच्या बदलीची मागणी हाळवणकर गटाने केली (BJP Awade vs Halvankar political dispute in Ichalkaranji) असताना आज आवाडे गट आयुक्तांच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. त्यांचा कार्यकाळ पुढे कायम ठेवण्याची मागणी या गटाने आमदार राहुल आवाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळेची मागणी या गटाने केली आहे.