esakal | इचलकरंजी: गणेशोत्सवासाठी पोलिसांचा अॅक्शन प्लॅन
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजी: गणेशोत्सवासाठी पोलिसांचा अॅक्शन प्लॅन

इचलकरंजी: गणेशोत्सवासाठी पोलिसांचा अॅक्शन प्लॅन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील प्रमुख मार्गावर आज संचलन केले. यामध्ये शस्त्रधारी पोलिस अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. बिट मार्शल, पोलिस वाहनांचा समावेश होता. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन पोलिसांनी या माध्यमातून केले. गणेशोत्सवासाठी इचलकरंजी पोलिसांनी अॅक्शन प्लॅन केला असून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.

हेही वाचा: 'पंधराव्या वित्त आयोगातून राज्यासाठी 1292 कोटी'

शहरात ६६३ सार्वजनिक, तर लाखो घरगुती गणपती आहेत. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या आदेशाने शहरात गांधी पुतळा चौकातून संचलन केले. पोलिस निरीक्षक राजू ताशीलदार, पोलिस उपनिरीक्षक गणेश खराडे, तेजश्री पवार, इकबाल महात यांच्या मार्गदर्शनाखाली संचलन केले.

असा राहणार बंदोबस्त

उद्यापासून (ता.१०) सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी शहरात कडक पोलिस बंदोबस्त असणार आहे. पोलिस दलातील एक उपविभागीय पोलिस अधिकारी, तीन पोलिस निरीक्षक, आठ सहायक पोलिस निरीक्षक/पोलिस उपनिरीक्षक, पोलिस कर्मचारी, २६० होमगार्ड्स तसेच पोलिस मुख्यालयातील आरसीपी प्लाटून, क्युआरटी प्लाटून, रिझर्व फोर्स तसेच राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी असा बंदोबस्त ठेवला आहे़. ते पोलिस उपाधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे़.

४०४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

गणेश उत्सव दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कलम १०७ अन्वये ६४९, कलम १०९ अन्वये ६, ११० अन्वये ३१ तर कलम ५५, ५६, ५७ अन्वये रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. पोलिस उपविभागीय कार्यक्षेत्रातील कलम १४४ (२) अन्वये ६३ जणांना संबंधित पोलिस ठाण्याच्या हद्दीतून हद्दपार केले आहे. गणेशोत्सवापूर्वी शहरातील तब्बल ४०४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तसेच नेमिष्टे टोळीतील पाच जणांना कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

६६३ मंडळांची नोंदणी

यावर्षी पहिल्यांदाच पोलिस दलाने ऑनलाइन पद्धतीने गणेश मंडळांची नोंदणी प्रक्रिया राबवली. केवळ शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १३ टक्क्यांनी गणेश मंडळांची संख्या वाढली आहे. यंदा शहापूर पोलिस ठाण्यात २७७, शिवाजीनगर २७१ आणि गावभाग पोलीस ठाण्यात ११५ मंडळांची नोंदणी झाली आहे.

वाहतूक मार्गात बदल

उद्या (ता.१०) गणेशमूर्तीचे आगमन होणार आहे. त्यामुळे शहरात व शहरातील मुख्य बाजारपेठेत व रोडवर वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी रस्ते वाहतूकीसाठी बंद करण्यात येणार आहे. शिवाजी महाराज पुतळा स्टेशन रोडवरून येणारे चार चाकी व अवजड वाहनांना मलाबादे चौककडे जाण्यास बंदी असेल.

झेंडा चौक, नादिवेस व सांगली नाकाकडून येणारे चार चाकी व अवजड वाहनांना जनता चौककडे जाण्यास वाहतूक बंद असेल. वाहतुकीसाठी शिवाजी पुतळा ते झेंडा चौक हा वाहतूक शाखेकडून बंद करण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास अडसूळ यांनी सांगितले.

loading image
go to top