

Police seize ₹5.5 lakh from gambling den in Ichalkaranji; 11 accused booked in the case.
Sakal
इचलकरंजी: गावभाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत सांगली रोडवरील पाटील मळा परिसरात घरातच सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडक कारवाई केली. मध्यरात्री छापा टाकून अकरा जणांना पकडले. या कारवाईत पाच लाख ५६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी माजी नगरसेवक कुख्यात गुंड मनोज किसन साळुंखे याच्यासह एकूण ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.