

Rangoli village Ichalkaranji youth killing case
esakal
Kolhapur Crime Village Yatra : इचलकरंजी शहरालगत असलेल्या रांगोळी येथील काळम्मावाडी येथील माळरानावर दुचाकीवरून पाठलाग करत आलेल्या तिघांनी आज रात्री एका तरुणाला धारदार शस्त्राने भोसकले. या खुनी हल्ल्यात पोटात खोलवर वार झाल्याने शुभम कुमार सादळे (वय २७, रा. काळम्मावाडी वसाहत, रांगोळी) याचा मृत्यू झाला. घटनास्थळी हल्लेखोराचा गॉगल आणि शस्त्राचे आवरण पोलिसांना मिळून आले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटली असून, शिवाजीनगर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.