

Sewage Pollution Warning by Collector
sakal
कोल्हापूर : इचलकरंजी महापालिकेने सांडपाणी प्रक्रिया नीट केलेली नाही. त्यामुळे सांडपाणी नदीत जात असल्याची तक्रार आहे. तुमचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे कामही वेळेत होत नाही. जर सांडपाण्यामुळे काविळीची साथ पसरली किंवा आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या तर कोणत्याही अधिकाऱ्याची गय करणार नाही, असा सज्जड दम जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी इचलकरंजी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला.