
Ichalkaranji Politics
esakal
Ichalkaranji Municipal News : पंडित कोंडेकर : महाविकास आघाडीच्या आंदोलनामुळे शहरातील पाणीप्रश्न पुन्हा एकदा तापला आहे. ऐन गणेशोत्सवात नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. महापालिका प्रशासनाकडून यामध्ये आलेल्या अडचणी तूर्त तरी दूर केल्या आहेत. त्यामुळे पुढील दोन-चार दिवसांत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्याची आशा आहे.
मात्र, पुढील प्रदीर्घ काळ सणासुदीचा आहे. त्याहीपेक्षा महापालिकेची पहिली निवडणूक तोंडावर आहे. अशा कठीण परिस्थितीत शहरातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही, याची खबरदारी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यादृष्टीने महापालिका प्रशासनाला कसरत करावी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.