Kolhapur Illegal Gender Test : नाव श्रद्धा पण काम अंधश्रद्धा, उमलणाऱ्या कळ्या खोडणारा डॉक्टर; एजंट ताब्यात, सोनोग्राफी मशीन, गोळ्या जप्त

Doctor Arrested for Gender Test : कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री येथे गर्भलिंग निदानप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली. डॉक्टर व एजंटला ताब्यात घेत पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, निदान किट आणि गोळ्या जप्त करण्यात आल्या.
Kolhapur Illegal Gender Test

Kolhapur Illegal Gender Test

esakal

Updated on

Kolhapur Sex Determination Raid : बिद्री (ता. कागल) येथे मुख्य रस्त्यावरील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान करताना पोलिसांनी छापा टाकून डॉक्टरसह एका एजंटाला आज सायंकाळी ताब्यात घेतले. डॉ. युवराज विठ्ठल पाटील (वय ४५, रा. सोनाळी, ता. कागल) आणि एजंट संभाजी वसंत शिंदे (४०, रा. बोरीवडे, ता. कागल) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडील पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, गर्भपातासाठीच्या गोळ्या, तसेच रोकड जप्त केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि इस्पूर्ली पोलिस ठाण्याच्या पथकाने कारवाई केली. मुरगूड पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com