Heavy Rain Alert : हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरतोय, पुढचे तीन दिवस पावसाचा अलर्ट; सतर्क राहण्याचे आवाहन

Weather Update : आजपासून जिल्ह्यात पाऊस सुरू होण्याबाबत हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला. सकाळपासूनच वातावरण ढगाळ राहिले.
Heavy Rain Alert

Heavy Rain Alert

esakal

Updated on
Summary

कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा पावसाची सुरुवात

अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी पुन्हा हलक्या ते जोरदार सरी सुरू झाल्या. धरणक्षेत्रातही पाऊस झाल्याने विसर्ग वाढवला; पंचगंगेची पाणीपातळी १३ फूट ६ इंचांवर पोहोचली.

हवामान खात्याचा इशारा

शनिवारपासून तीन दिवस घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’ आणि इतर भागांत ‘यलो अलर्ट’. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ; काही बंधारे पाण्याखाली.

करुळ घाटात दरड कोसळली

गगनबावडा तालुक्यातील करुळ घाटात सायंकाळी ५ वाजता दरड कोसळून वाहतूक काही काळ ठप्प. यंत्रणेने तातडीने दरड हटवून वाहतूक सुरळीत केली; मात्र चिखलमातीमुळे वाहतूक मंदावलेली आहे.

Maharashtra Rain Update : गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती दिलेल्या पावसाने शुक्रवारी पुन्हा सुरुवात केली. शहरासह जिल्ह्यात दिवसभर पावसाच्‍या हलक्या सरी कोसळत रिपरिप सुरू राहिली. धरणक्षेत्रातही सुरू असलेल्या पावसाने धरणातील विसर्ग वाढविण्यात आल्याने पंचगंगा नदीच्या पाणीपातळीतही तीन इंचांनी वाढ झाली. ती रात्री १३ फूट सहा इंच इतकी होती. दरम्यान, भारतीय हवामान खात्याकडून उद्या, शनिवारपासून पुढील तीन दिवस जिल्ह्यातील घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’, तर इतरत्र यलो अलर्टचा अंदाज वर्तविण्यात आला. आजपासून जिल्ह्यात पाऊस सुरू होण्याबाबत हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com