Heavy Rain Forecast : नवरात्रोत्सवाचा काळ पावसात, पुढच्या चार दिवसांचा हवामान विभागाचा अंदाज आला; मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस

IMD Forecast Warns : राधानगरी, गगनबावडा, आंबा, आंबोली येथे अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून प्रभावी उपाययोजना राबविण्यासाठी सज्ज राहण्याची गरज आहे.
Heavy Rain Forecast

Heavy Rain Forecast

esakal

Updated on
Summary

मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा – २७ सप्टेंबर (शनिवार) ते ३० सप्टेंबर (मंगळवार) दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात सतत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता, विशेषतः राधानगरी, गगनबावडा, आंबा, आंबोली परिसरात.

धरणे व नद्यांची स्थिती गंभीर – सर्व धरणे शंभर टक्के भरलेली असल्याने पाणी सोडावे लागेल, त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढून पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका.

नवरात्रोत्सवात अडचणींची शक्यता – श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी होणार असून पावसामुळे दर्शनासाठी व वाहतुकीसाठी अडचणी निर्माण होऊ शकतात; प्रशासनाला सतर्कतेचे आदेश.

Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात नवरात्रोत्सवाच्या काळात उद्या, शनिवार (ता. २७) ते मंगळवार (ता. ३०) दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये राधानगरी, गगनबावडा, आंबा, आंबोली येथे अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून प्रभावी उपाययोजना राबविण्यासाठी सज्ज राहण्याची गरज आहे. जिल्ह्यात वादळासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभाग (आयएमडी), मुंबई यांच्याकडून वर्तविण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com