
Nandani Math Kolhapur : नांदणी येथील लोकांच्या भावना गुंतलेल्या ‘महादेवी’ उर्फ माधुरी हत्तीणला अंबानी यांच्या वनतारा हत्ती संवर्धन केंद्रात हलवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यावर तिचे हस्तांतरण झाले. राज्यभर याचे पडसाद उमटू लागल्यानंतर वनतारा हत्ती संवर्धन केंद्राने याची दखल घेतली आहे. खासदार धनंजय महाडिक आणि खासदार धैर्यशिल माने यांनी वनतारा टीमशी चर्चा केल्यानंतर भेट देण्याचे ठरले.