
Gokul Dudh Sangh
esakal
Satej Patil Vs Shoumika Mahadik : ‘पाच वर्षांपूर्वी ज्यांनी स्वत:ची घरे भरली, त्यांना घरी बसवत आमच्याकडे सत्ता दिली. पाच वर्षांत आम्ही चांगला कारभार करत दूध उत्पादकांना न्याय दिला. तसेच अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी विरोधकांसोबत चर्चा करून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्यामुळे विरोधकांनी थोडी परिपक्वता दाखवायला पाहिजे होती’, अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी संचालिका शौमिका महाडिक यांचे नाव न घेता केली.