
Kolhapur Shocking Family Incident : बहिणीने ११ वर्षांपूर्वी केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात धरून निवृत्त जवानाने आपल्या मेहुण्यावर (दाजी) पिस्तुलातून गोळीबार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या गोळीबारात मेहुण्याच्या मांडीवर गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाले. विनोद अशोक पाटील (वय ३९, रा. पाटील वाडा, नावली) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी कोडोली पोलिसांनी नीलेश राजाराम मोहिते (वय ३८, रा. पाटील वाडा, नावली) याला अटक केली. ही घटना सोमवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नावली (ता. पन्हाळा) येथे घडली.