
Kolhapur Gold Stolen For Wedding : न्यू शाहूपुरीतील अनंत प्रेस्टीज इमारतीतील बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून ५० तोळे सोन्याचे दागिने, हिऱ्याच्या अलंकारांवर चोरट्यांनी डल्ला मारला. सोमवारी सकाळी अकरा ते दोनच्या दरम्यान भरदिवसा हा प्रकार घडला. चिंचोळ्या बोळातील इमारतीत माहितगारांकडूनच चोरी झाल्याचा पोलिसांना संशय आहे. सीपीआरमधील मेडिसीन विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. अनिता अरुण परितेकर यांनी फिर्याद दिली.