
Kolhapur OBC Reservation
esakal
तीन ठळक मुद्दे (Highlight Summary Points):
महिला सत्तेचा उदय:
कोल्हापूर जिल्ह्यातील 10 पैकी 6 नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष पद महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले असून, यात हुपरी (अनुसूचित जाती महिला) व कागल, मलकापूर, कुरुंदवाड, मुरगूड आणि पन्हाळा (खुल्या महिला प्रवर्ग) यांचा समावेश आहे.
ओबीसींना धक्का:
या वेळी एकाही नगरपालिकेत ओबीसी आरक्षण घोषित झालेले नाही, ज्यामुळे मागासवर्गीयांमध्ये नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता आहे.
राजकीय समीकरणांची रंगत:
कागल व मुरगूड या राजकीय दृष्ट्या संवेदनशील नगरपालिकांमध्ये महिला आरक्षणामुळे गटबाजीला नवा वळण मिळण्याची शक्यता आहे. हसन मुश्रीफ, संजय मंडलिक, संजय घाटगे आणि समरजितसिंह घाटगे यांचे गट याठिकाणी निर्णायक ठरणार आहेत.
Kolhapur Political News : कोल्हापूर जिल्ह्यातील दहा नगरपालिका व तीन नगरपंचायतींपैकी सहा नगरपालिकांतील नगराध्यक्ष पद आज खुल्या महिला प्रवर्गासाठी आरक्षित राहिले. यापैकी हुपरीत अनुसुचित जाती प्रवर्गातील महिला, तर कागलसह मलकापूर, कुरुंदवाड, मुरगूड व पन्हाळा पालिकेतील नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले. दरम्यान, जिल्ह्यातील आजरा, चंदगड व हातकणंगले नगरपंचायतीत नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले. जिल्ह्यात नागरिकांचा मागास प्रवर्गाचे (ओबीसी) आरक्षण एकाही नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी जाहीर झाले नाही.