महापुराचा दणका! नुकसानग्रस्त कामांसाठी शहरात 150 कोटींची गरज

कोल्हापूर शहराला गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे पडलेला महापुराचा विळखा.
कोल्हापूर शहराला गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे पडलेला महापुराचा विळखा.
Updated on
Summary

यासाठी महापालिकेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे.

कोल्हापूर: शहरात पुरामुळे नुकसान झालेले रस्ते, सांडपाणी प्रक्रिया, पाणीपुरवठा सुरळीत करणे, नाल्यांवरील संरक्षण भिंती उभारणे, शिंगणापूर पंपिंगची उंची वाढवणे, सांडपाणी व्यवस्थापनाचे नियोजन करणे, ड्रेनेज लाईन मॅनहोलमधील गाळ काढणे यांसह इतर कामांसाठी सुमारे १५० कोटींचा निधी महापालिकेला आवश्‍यक आहे. यासाठी महापालिकेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे.

कोल्हापूर शहराला गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे पडलेला महापुराचा विळखा.
कोल्हापूर विमानतळाचे नामकरण करा; संभाजीराजेंची मागणी

शहरातील ८१ पैकी ३५ प्रभागांतील रस्ते पुराच्या पाण्याखाली जाऊन खराब झाले आहेत. शहरातील १०७.९५ किलोमीटर रस्ते अतिवृष्टीमुळे खराब झाले असून, यासाठी सुमारे २७ कोटी ८६ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. रस्ते दुरुस्ती, रिटेंनिंग वॉल, क्रॉसड्रेन व गटर, विद्युतीकरण, महानगरपालिका इमारत दुरुस्ती, टॅंकरने पाणीपुरवठा करणे, पंपिंग मशिनरी पूर्ववत करणे, ड्रेनेल पंपिंग मशिन (एटीपी), घनकचरा व्यवस्थापनासाठी ३५ कोटी ४९ लाख निधी आवश्‍यकता आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीसह महापुराचा तडाखा बसला आहे. ३५ प्रभागाला पूर आणि पाण्याचा फटका बसला आहे.

कोल्हापूर शहराला गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे पडलेला महापुराचा विळखा.
कोल्हापूर आणि पूर ही संकल्पना बदलू ; सतेज पाटील यांची माहिती

शहरातील हे चित्र पूर्ववत करण्यासाठी महापालिकेला आर्थिक नियोजन करावे लागणार आहे. मात्र, आर्थिक परिस्थिती पाहता महापालिकेच्या निधीतून हे रस्ते करता येणे शक्‍य नसल्याने शासनानेच महापालिकेला हातभार लावावा लागणार आहे. यासाठीच हा आरखडा मुख्यंत्र्यांना दिला आहे. नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur illegal abortion investigation
Radhanagari Dam 100 percent full
Radhanagari Dam 97 percent full update
Girish Mahajan latest statement on Almatti Dam
Marathi News Esakal
www.esakal.com