
Kolhapur Political News
esakal
महायुतीत जागावाटपावर वादग्रस्त स्थिती:
कोल्हापूर महापालिका निवडणुकीत महायुतीतून ८१ जागांवर लढण्याचे ठरले असून, भाजप खासदार व शिवसेना (शिंदे गट) आमदारांनी ८०-८० जागांची मागणी केल्याने राष्ट्रवादीला (अजित पवार गट) जागा शिल्लक राहिलेल्या नाहीत.
हसन मुश्रीफ यांचा टोला:
राष्ट्रवादी २० वर्षे महापालिकेच्या सत्तेत असूनही महायुतीतील नेते त्यांना विसरू पाहत आहेत, असा टोल वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी खासदार धनंजय महाडिक व आमदार राजेश क्षीरसागर यांचे नाव न घेता लगावला.
राष्ट्रवादीचे बळकट अस्तित्व:
कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी अजूनही बळकट असून काही तालुक्यांत विस्तार बाकी आहे. “आमचा नेम चुकणार नाही” असे म्हणत मुश्रीफ यांनी पक्षाच्या ताकदीवर विश्वास व्यक्त केला.
Kolhapur Municipal : महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती म्हणून ८१ जागा लढविल्या जाणार आहेत. मात्र, भाजपचे विद्यमान खासदार आणि शिवसेनेचे शहरचे आमदार यांनी २० वर्षे सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादीला एकही जागा शिल्लक ठेवली नाही. दोघांनीही ८०-८० जागा आताच वाटून घेतल्या आहेत. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि तुमचा मित्र पक्ष असणारा राष्ट्रवादी काँग्रेसही आहे. २० वर्षांपासून कासवाच्या गतीने महापालिकेच्या सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादीला तुम्ही विसरून चालणार नाही, असा टोलाही वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर यांचे नाव न घेता लगावला.