Fertilizer price hike : नवीन वर्षात रासायनिक खतांची दरवाढ; जिल्ह्यात शेतकऱ्यांना बसणार २५ कोटींचा फटका
Kolhapur News : हंगामी लागणीला, खोडवा पिकाला १० : २६ : २६ खताची मागणी होत आहे. जुन्या दराची खते दोन दिवसांत येणार आहेत. मात्र, याबरोबर लिंकिंगचे खत, नॅनो युरिया व डी.ए.पी. घेण्याचा तगादा कंपनीकडून होलसेल दुकानदाराला लावला जात आहे.
कुडित्रे : नवीन वर्षात १ जानेवारीपासून रासायनिक खतांचे दर वाढणार असून, १०:२६:२६ खताची बॅग आता २५५ रुपये वाढीव दराने मिळणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात खताची मागणी पाहता शेतकऱ्यांना २५ कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.