निवडणुकीनंतर केवळ बुरे दिन, सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील ;शिवसेनेचे इंधन दरवाढ विरोधात शंखध्वनी आंदोलन

increased rate of petrol and diesel protest against of shivsena rate in kolhapur
increased rate of petrol and diesel protest against of shivsena rate in kolhapur
Updated on

कोल्हापूर : पेट्रोल-डिझेलची दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो व अच्छे दिनच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो, अशा घोषणा देत शिवसेनेतर्फे आज शंखध्वनी आंदोलन करण्यात आले. दाभोळकर कॉर्नर चौकात त्याचे आयोजन केले होते. 

पत्रकात म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रासह देशभरात पेट्रोल व डिझेल दरवाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. सत्तेवर येण्यापूर्वी अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून मोदी सरकारने नागरिकांची फसवणूक केली आहे. निवडणुकीनंतर केवळ बुरे दिन नागरिकांनी अनुभवले आहेत. मोदी सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार नसून ते केवळ धनदांडग्या उद्योजकांचे आहे. हे अनेक वेळा स्पष्टही झाले आहे. 

सरकारने पेट्रोल व डिझेल दरवाढ कमी करावी. अन्यथा सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल. आंदोलनात जिल्हाप्रमुख संजय पवार, हर्षल सुर्वे, मंजित माने, संजय जाधव, नरेश तुळशीकर, योगेंद्र माने, अमित कोराणे, स्मिता सावंत , पूजा शिंदे, शुभांगी पोवार, मेघना पेडणेकर, दीपाली शिंदे, ऋतुजा जाधव, राजेंद्र पाटील, भगवान कदम, बाजीराव पाटील, सुरेश पाटील, भीमराव पाटील, विराज पाटील, राजू यादव, विनोद खोत, वंदना पाटील सहभागी झाले होते.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur flood situation latest
Bay of Bengal Weather System Maharashtra Rain Alert
Panhala Police Act Swiftly After Huge Tree Falls Across Main Road
Kolhapur farmers oppose expressway project
Marathi News Esakal
www.esakal.com