Kolhapur Cricket Fans
esakal
कोल्हापूर : पाकिस्तानने दिलेल्या लक्ष्याजवळ जसे भारतीय फलंदाज पोहोचले, तसे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तरुणांची पावले वळली. दुचाकीचे सायलेन्सर आणि हॉर्न वाजवतच तरुणाई येथे पोहोचली. हातात तिरंगा, भगवा ध्वज घेऊन तरुणाईचा जल्लोष सुरू झाला. आशियाई कपमधील सामना (Kolhapur Cricket Fans) जरी दुबईत झाला असला तरी जल्लोष मात्र कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार झाला.