
Mahalaxmi Train News
esakal
Mahalaxmi & Haripriya Express Trains : छत्रपती शाहू टर्मिनसवरून कोल्हापूर ते मुंबईमार्गे धावणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेस व कोल्हापूर ते तिरुपतीमार्गे धावणाऱ्या हरिप्रिया एक्स्प्रेसचे तीन स्लिपर कोच डबे कमी केले जाणार आहेत. यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. या तीन डब्यांच्या जागी केवळ एकच एसी थ्री टायर डबा जोडला जाणार आहे. या रेल्वे गाड्यांसाठी प्रवाशांची वेटिंग लिस्ट असताना डबे कमी का केले, अशी विचारणा प्रवाशांतून होऊ लागली आहे.