
Newborn Found Talandage Kolhapur : तळंदगे (ता. हातकणंगले) येथील धोंडीबा नानासो फडतारे यांच्या उसातील शेतात अंदाजे तीन महिन्यांचे अर्भक मृतावस्थेत पुरलेल्या स्थितीत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना तळंदगे गावातून औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या मार्गावर घडली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम हुपरी पोलिसांकडून सुरू होते. प्रकरणाचा तपास एपीआय विकास शिंदे करत आहेत.