कोल्हापूर : दडलेल्या पर्यटनाकडे वेधले लक्ष

जिल्ह्यातील मंदिरे, प्रेक्षणीय स्थळे, किल्‍ल्यांची माहिती देणारे संकेतस्थळ तरुणाकडून विकसित
tourist places
tourist places

कोल्हापूर : जिल्ह्यातील मंदिरे, प्रेक्षणीय स्थळे, वास्तू गड-किल्ले, भ्रमंती याची माहिती देणारी संकेतस्थळे (वेबसाईट) शहरातील एका तरुणाने तयार केली आहेत. त्या माध्यमातून जिल्ह्यातील दडलेल्या पर्यटनस्थळांकडे पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत आहे. याच धर्तीवर जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील अपटेड देणारे संकेतस्थळ विकसित करून रोजगार वाढीचाही पर्याय नव्या पिढीला निवडता येणे शक्य होणार आहे.

छत्रपती शहाजी वसाहत येथे कैलाश दुधणकर राहतात. ते सध्या कॅम्प्युटर नेटवर्किंगच्या क्षेत्रात काम करतात. त्यांना भ्रमंतीचा छंद आहे. ते शिवशिक्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा छंद जोपासतात. भटकंती करताना संबंधित भाग, येथील मंदिरे, वास्तू, ऐतिहासिक स्थळे समजून घेताना कोणाचा तरी आधार घ्यावा लागत होता. लॉकडाउनच्या काळात त्यांना जिल्ह्याची संपूर्ण माहिती देणारी एक वेबसाईट तयार करावी, त्या माध्यमातून जिल्ह्याचा पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करण्याचा विचार आला. जिल्ह्यातील मंदिरे, वास्तू, प्रेक्षणीय स्थळे, ऐतिहासिक स्थळे यांना प्रत्यक्ष भेटीसह विविध पुस्तकांच्या आधारे माहिती संकलित केली. मूर्ती अभ्यासक ॲड. प्रसन्न मालेकर, उमाकांत राणिंगा, शिवशक्ती प्रतिष्ठानचे प्रमुख साताप्पा कडव आणि देवराई विषयावर उमाकांत चव्हाण यांचेही मार्गदर्शन घेतले. तसेच संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधून त्यांनी जिल्ह्याची माहिती देणारी www.kolhapurexplorer.com ही वेबसाईट तयार केली. या कामात त्यांना छायाचित्रकार शुभम दहीवडीकर सहकार्य करतात. त्यांच्या वेबसाईटला आतापर्यंत १५ हजार जणांनी भेट दिली आहे. त्यांच्याकडून येणाऱ्या अभिप्रेयातून कैलाश हे वेबसाई अपटेड करतात. गावा-गावातील मंदिरे, प्रेक्षणीय स्थळाची माहिती या वेबसाईटवर देऊन पर्यटनवाढीचा विकास व्हावा हा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

व्यावसायिक दृष्टीने पाहण्याची गरज

वेबसाईटमध्ये विविध क्षेत्रांची अभ्यासपूर्ण माहिती, तेथील बारकावे, जुने-नवे संदर्भ अशी माहिती संकलित करून या ठिकाणी भेट देणाऱ्यांपर्यंत पोचविण्याचे सामर्थ्य यात आहे. तरुणांसाठी ही नामी संधी असून, त्यांनी त्यांच्या शिक्षणाचा आणि माहितीचा वापर करून विविध क्षेत्रांतील परिपूर्ण वेबसाईट तयार केल्यास अनेक दडलेल्या गोष्टी त्या-त्या घटकांपर्यंत पोचविणे शक्य होईल. तरुणांनी याकडे व्यावसायिक दृष्टीने पाहण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com