

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवर सरकारच्या उच्चस्तरीय बैठकीत काय घडले, याची माहिती राजू शेट्टींनी दिली आहे.
esakal
Maharashtra Farmers Loan Waiver : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तब्बल दोन ते अडीच तास बंद खोलीत चर्चा झाली. या चर्चेत उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, पणन मंत्री जयकुमार रावळ, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, पंकज भोयर यांच्यासह मुख्यमंत्री कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी, तसेच शेतकरी नेते बच्चू कडू, महादेव जानकर, वामनराव चटप, अजित नवले, उन्मेश पाटील, राजन क्षीरसागर आणि रविकांत तुपकर उपस्थित होते. दरम्यान, याबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांनी फेसबुक पोस्ट करत काल नेमका काय प्रकार घडला याबाबत सविस्तर खुलासा केला आहे. राजू शेट्टी यांनी या पोस्टच्या माध्यमातून सरकारचे अक्षरश: वाभाडे काढल्याचे या पोस्टमधून दिसून आले.