

Drugs Ordered via Instagram
esakal
Online Drug Supply Kolhapur : खुल्या बाजारात विक्रीला बंदी असलेल्या मॅफेटेरामाईन या इंजेक्शनची इन्स्टाग्रामवरून खरेदी करून चढ्या दराने विकणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. साहिल किरण पाटील (वय १९, रा. यड्राव, ता. हातकणंगले) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून नशिल्या इंजेक्शनच्या ६७ कुपी, मोपेड, मोबाईल असा एक लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. इन्स्टावर जाहिरात करणाऱ्या संशयिताचा शोध पोलिस घेत आहेत.