
Kolhapur Politics : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुखपदावरून संजय पवार यांना हटवून कोल्हापूर दक्षिण शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. तर कोल्हापूर दक्षिण प्रमुखपदी हर्षल सुर्वे यांची व कोल्हापूर उत्तर विधानसभा प्रमुखपदी विशाल देवकुळे यांची नियुक्ती झाली. याची घोषणा काल ‘मातोश्री’वरून करण्यात आली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षातील पदाधिकाऱ्यांत बदल केला आहे. मात्र, त्यावर काही प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असून, दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे जाहीर केले आहे.