
भाजपमधील अंतर्गत कलह समोर, कोण केले आरोप?
esakal
हायलाइट्स (Highlight Summary – 3 Points)
महेश जाधव यांचा भाजप नेत्यांना थेट इशारा
“पक्षात काही ‘मांडवली बादशहा’ फिरत आहेत; पण उमेदवारी हॉटेलमध्ये नाही, तर पक्ष कार्यालयातून ठरते,” असा जाधव यांचा स्पष्ट इशारा.
निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच उमेदवारी
जाधव यांनी सांगितले की, “आरक्षणानंतर सर्व्हे घेतला जाईल आणि ज्यांचे नाव आघाडीवर असेल त्यांनाच उमेदवारी मिळेल. निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाईल.”
‘फलक लावून उमेदवारी मिळत नाही’ — जाधवांचा इशारा
“जिल्हाध्यक्षांचा फोटो फलकावर लावा. या पक्षात फलक नव्हे, तर काम पाहून उमेदवारी दिली जाते,” असेही त्यांनी बैठकीत स्पष्ट केले.
Kolhapur BJP War : ‘भारतीय जनता पक्षात काही मांडवली बादशहा फिरत आहेत. महापालिकेला तुझी उमेदवारी नक्की, तू कामाला लाग, असे सांगत आहेत; पण पक्षाची उमेदवारी देण्याची एक प्रक्रिया आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच उमेदवारीवेळी प्राधान्य दिले जाईल. भाजपची उमेदवारी हॉटेलमध्ये नाही, तर पक्षाच्या कार्यालयातून दिली जाते,’ असा टोला महेश जाधव यांनी भाजप बैठकीत काही नेत्यांना लगावला. पक्षाची उमेदवारी मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्याकडूनच नक्की होईल, असेही त्यांनी सांगितले. पक्ष कार्यालयात आज इच्छुकांची बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते.