स्वाभिमानीच्या 20व्या ऊस परिषदेला सुरुवात

जयसिंगपूर येथील विक्रमसिह क्रीडांगणावर  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विसाव्या ऊस परिषदेस जमलेले शेतकरी.
जयसिंगपूर येथील विक्रमसिह क्रीडांगणावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विसाव्या ऊस परिषदेस जमलेले शेतकरी. sakal
Summary

राजू शेट्टी यंदाच्या हंगामात कोणती भूमिका घ्यायची याबाबतचा निर्णय जाहीर करणार आहेत. यांच्या या भूमिकेकडे राज्यभरातील उत्पादकांच्या नजरा लागल्या आहेत.

जयसिंगपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विसाव्या ऊस परिषदेस येथील विक्रमसिह क्रीडांगणावर सुरुवात झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatana) प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांची प्रमुख उपस्थिती आहे. या परिषदेला राज्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी,संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोपळे, रविकांत तुपकर, युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे, सतीश काकडे, प्रशांत डिक्कर यांच्यासह विविध जिल्ह्यांतील शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित आहेत.

सायंकाळी शेट्टी यंदाच्या हंगामात कोणती भूमिका घ्यायची याबाबतचा निर्णय जाहीर करणार आहेत. शेट्टी यांच्या या भूमिकेकडे राज्यभरातील उत्पादकांच्या नजरा लागल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com