
Nandani Grampanchayat : नांदणी ग्रामपंचायतीतर्फे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यात्रा यंदा १० ऑगस्ट २०२५ रोजी होणार असली तरी, हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार आहे. गावचे भूषण ठरलेली आणि ग्रामस्थांच्या भावना जपणारी “महादेवी” उर्फ “माधुरी” हत्तीण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुजरात येथील जामनगरमधील वनतारा संस्थेत स्थलांतरित करण्यात आली.