esakal | मंगल कार्यालय चालकाला दंड; वऱ्हाडींसह 142 जणांची स्वॅब तपासणी
sakal

बोलून बातमी शोधा

marrage

मंगल कार्यालय चालकाला दंड; वऱ्हाडींसह 142 जणांची स्वॅब तपासणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कागल (कोल्हापूर) : येथील मटकरी हॉल मंगल कार्यालयात लग्नसोहळ्यासाठी २०० हून अधिक माणसे जमविल्याप्रकरणी प्रांताधिकारी प्रसेनजित प्रधान यांनी कारवाई केली आहे. मंगल कार्यालय चालकाला १० हजार दंड ठोठावलाच शिवाय वधू-वरासह जमलेल्या १४२ लोकांचे स्वॅब तपासणीसाठी गेतले. आज दुपारी साडेबारा वाजता ही कारवाई केली.

येथील सांगाव रोडवरील मटकारी हॉलमध्ये एका विवाह सोहळा सुरू होता. सोहळ्याला २०० हून अधिक नातेवाईक आणि मित्र परिवार हजर होते. या वेळी प्रांताधिकारी प्रधान, तहसीलदार शिल्पा ठोकडे आणि गटविकास अधिकारी सुशिल संसारे रणदिवेवाडीला चालले होते. कार्यालयासमोरून जाताना अनेक वाहने दिसली. त्यांनी मंगल कार्यालयात भेट दिली असता लग्नकार्यासाठी २०० हून अधिक लोक जमल्याचे आढळले. ५० पेक्षा अधिक लोक जमल्याने प्रधान यांनी मंगल कार्यालय चालकाला १० हजार रुपयांचा दंड केला.

हेही वाचा- आंतरजातीय लग्नाने मुलीच्या वडिलांचा संताप; रागाच्या भरात उचलले टोकाचे पाऊल

कार्यासाठी उपस्थित वधूवरासह १४२ लोकांचे स्वॅब घेतले. ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत व ज्यांचा कोरोना निगेटिव्ह आहे अशांना वगळले. संकलित केलेले स्वॅब सीपीअर रुग्णालयात पाठविले. दरम्यान पालिकेचे आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता, लग्नसोहळ्यासाठी पालिकेची परवानगी घेतली नसल्याचे सांगितले.

loading image