Kagal Nagar Parishad Election: कागल नगर परिषद निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक ९ ब मधून मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सून सेहरनिदा मुश्रीफ उभ्या होत्या. शिंदे गटाच्या उमेदवाराने माघार घेतल्याने सौ. सेहरनिदा बिनविरोध विजयी झाल्या आहेत. .राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि छत्रपती शाहू समूहाचे नेते समरजीत घाटगे यांच्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने दिलजमाई झाली आहे. उभय नेत्यांनी मंगळवारी एकत्रित पत्रकार परिषद आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला..Ichalkaranji Election: इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत महायुतीतील जागा वाटपावर पेच; घटक पक्षांचे लक्ष भाजपाकडे खिळले .दुसरीकडे कागल नगर परिषद निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक ९ ब मधून हसन मुश्रीफ यांच्या स्नूषा सेहरनिदा मुश्रीफ या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. हसन मुश्रीफांचे पुतणे नवाज मुश्रीफ यांच्या सेहरनिदा या पत्नी आहेत. त्यांच्याविरोधात शिंदे गटाकडून नूरजहा नायकवडी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता..Nashik Politics : पंचवटी प्रभाग दोनमध्ये 'आडगाव'चा गड राखणार कोण? भाजप विरुद्ध महाविकास आघाडीत चुरशीची लढत अटळ.या बिनविरोध निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत आतषबाजी केली. हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबातील उमेदवारामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराने माघार घेतल्याने ही निवड सोपी गेली. कोल्हापूर जिल्ह्यातील इतर स्थानिक निवडणुकांकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.