

Hasan Mushrif Virendra Mandlik
esakal
Gokul Election 2026 : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर नवनिर्वाचित संचालक विरेंद्र संजय मंडलिक यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन त्यांचे आशिर्वाद घेतले. या भेटीचे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मंडलिक आणि मुश्रीफ या दोन घराण्यांमधील राजकीय संबंधांची पार्श्वभूमी पाहता, या भेटीला विशेष महत्त्व दिले जात आहे.