बसवर 'जय महाराष्ट्र' लिहून गाडीला फासलं काळं; कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा तात्काळ बंद I Belgaum | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karnataka State Transport Corporation

बेळगाव आगारातील काही चालकांनी कोल्हापूरला जाणाऱ्या बसेस निपाणीतून मागे हाकल्या.

Belgaum : बसवर 'जय महाराष्ट्र' लिहून गाडीला फासलं काळं; कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा तात्काळ बंद

निपाणी : महाराष्ट्रात कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या (Karnataka State Transport Corporation) बसेसवर जय महाराष्ट्र असे लिहून काळे फासल्याने कर्नाटक-महाराष्ट्र बसेस (Karnataka-Maharashtra Border Dispute) शुक्रवारी दुपारी बंद झाल्या. विविध आगाराच्या लांब पल्याच्या बसेस निपाणी व कोल्हापूर येथे थांबवून ठेवल्या आहेत. त्याचा परिणाम दोन्ही राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेवर झाला.

शुक्रवारी (ता. 25) सकाळपासून दोन्ही राज्यातील बससेवा (Bus Service) सुरळीत सुरु होती. मात्र, कोल्हापूर येथे कर्नाटकच्या बसेस (Karnataka Bus) अडवून ठेवल्याने महाराष्ट्र बसेसही कर्नाटकात येण्यास मज्जाव केल्याने दोन्ही राज्यातील बससेवा दुपारी 12 नंतर विस्कळीत झाली. त्यामुळे प्रवाशांसह मजूर, कामगार, विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. बेळगाव, धारवाड, हुबळी, हावेरी, राणेबेण्णूर, रायचूर या आगारांच्या निपाणी, पुणे, मुंबई, सातारा, औरंगाबाद, नाशिक येथे जाणाऱ्या बसेस कोल्हापूर मार्गावरून बाहेरून सुरु ठेवल्या होत्या. अनेक चालक व वाहकांनी धोका पत्करण्यापेक्षा आपल्या बसेस निपाणी बस स्थानकातच थांबून ठेवल्या.

हेही वाचा: Sanjay Raut : लोकांनी दुसऱ्या विषयाकडं वळावं आणि शिवरायांचा अपमान..; काय म्हणाले राऊत?

बेळगाव आगारातील काही चालकांनी कोल्हापूरला जाणाऱ्या बसेस निपाणीतून मागे हाकल्या. दुपारनंतर बससेवा सुरळीत सुरु होण्याचे संकेत दिसत होते. मात्र, तीन वाजेपर्यंत केवळ बाहेरून बससेवा सुरु होती. महाराष्ट्र बसेसही (Maharashtra Bus) बंद केल्याने दोन्ही आगारांचा जास्त महसूल बुडाला. प्रवाशांना खासगी वाहनांचा आर्थिक भुर्दंड बसला. दगडफेकीच्या भीतीने खासगी वाहनधारकही महाराष्ट्रात जाण्यास धजावत नव्हते. त्यामुळे निपाणी बसस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली होती. बससेवा बंद असल्याचे समजताच प्रवाशीही बुचकळ्यात पडले. निपाणी आगाराच्या बसेस स्थानकात आल्यानंतर चालकांना त्या थांबविण्याच्या सूचना अधिकारी करत होते. तसेच बसमधून प्रवाशांना उतरले जात होते.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

वातावरण तणावपूर्ण झाल्याने व कर्नाटकच्या बसेस कोल्हापुरात अडविल्याने बससेवा बंद करावी लागली. धोका टाळण्यासाठी लांब पल्ल्याच्या बसेस महामार्गावरून बाहेरून सुरु ठेवल्या आहेत. वातावरण शांत झाल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व मार्गावरील बससेवा सुरळीत केली जाईल.

-व्ही. एम. शशीधर, विभागीय नियंत्रणाधिकारी, चिक्कोडी