
Sugarcane Diversion Maharashtra : कर्नाटकातील अधिकृत आकडेवारीच्या विश्लेषणातून साखर उद्योगातील एक महत्त्वपूर्ण कल समोर आला आहे. स्थानिक साखर कारखान्यांकडून होणारे ऊस गाळप राज्यातील प्रत्यक्ष ऊस उत्पादनापेक्षा सातत्याने जास्त होत आहे. या वाढत्या विसंगतीला उसाचा पेचप्रसंग असे संबोधले जात असून कर्नाटकातील कारखान्यांना आपली गरज भागवण्यासाठी विशेषतः महाराष्ट्रातून ऊस आणण्यावर अधिक अवलंबून राहावे लागत असल्याची बाब समोर आली आहे. ही गोष्ट महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगलीसह सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीने चिंताजनक बनली आहे.