

Karul Ghat Truck Accident news
esakal
Karul Ghat accident news : करूळ घाटात दिंडवणेनजीक पाचशे फूट खोल दरीत सिमेंट भरलेला ट्रक कोसळून ट्रकचालक आणि सहायक असलेल्या बाप-लेकांचा जागीच मृत्यू झाला. दीड-दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर सह्याद्री जीवरक्षक पथक आणि पोलिसांना मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. हा अपघात आज पहाटे पाचच्या सुमारास झाला. राजू प्रेमसिंग राजपूत (वय ५९) व राहुल राजू राजपूत (वय २०, रा. कोचलगी तांडा, ता. जि. विजापूर, कर्नाटक) अशी मृत बापलेकांची नावे आहेत.