Ambabai Mandir Kirnotsav : सूर्यकिरणांनी अंबाबाईचं मुखकमल उजळलं; देवीच्या मुखकमलावर सोनसळी अभिषेक

किरणोत्सवाच्या (Kirnotsav) पहिल्या दिवशी ढगाळ वातावरणामुळे किरणे मंदिरात पोचू शकली नाहीत.
Ambabai Mandir Kirnotsav Kolhapur
Ambabai Mandir Kirnotsav Kolhapuresakal
Summary

सहा वाजून १८ मिनिटांनी सूर्यकिरणांनी देवीच्या चेहऱ्यावर प्रवेश केला आणि देवीचे मुखकमल उजळून निघाले.

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात (Ambabai Mandir Kolhapur) सुरू असलेल्या किरणोत्सव सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी काल मावळतीच्या सूर्यकिरणांनी देवीच्या मुखकमलावर सोनसळी अभिषेक केला. दरम्यान, आणखी दोन दिवस हा सोहळा होणार आहे.

Ambabai Mandir Kirnotsav Kolhapur
Kolhapur Collector : वादग्रस्त राहुल रेखावार यांची पुण्याला बदली; अमोल येडगे कोल्हापूरचे नवीन जिल्हाधिकारी

देवस्थान समितीच्यावतीने एलईडी स्क्रीनवरून थेट प्रसारण केले जात असल्याने भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे. किरणोत्सवाच्या (Kirnotsav) पहिल्या दिवशी ढगाळ वातावरणामुळे किरणे मंदिरात पोचू शकली नाहीत. काल दुसऱ्या दिवशी किरणांनी देवीचा चरणस्पर्श केला.

काल (बुधवार) सायंकाळी पाच वाजून २८ मिनिटांनी सूर्यकिरणे महाव्दारात आली. त्यानंतर पाच वाजून ५८ मिनिटांनी ती कासव चौकात पोचली. सहा वाजून तीन मिनिटांनी पितळी उंबरा, सहा वाजून सात मिनिटांनी चांदीचा उंबरा आणि सहा वाजून १४ मिनिटांनी किरणांनी देवीचा चरणस्पर्श केला. त्यानंतर पुढे दोन मिनिटांनी ती खांद्यापर्यंत पोचली.

Ambabai Mandir Kirnotsav Kolhapur
कोकणातील कातळशिल्प 'राज्य संरक्षित'; शासनाकडून मोठी घोषणा, 175 गावांत 2 हजारांहून अधिक कातळखोद चित्रांची नोंद

सहा वाजून १८ मिनिटांनी सूर्यकिरणांनी देवीच्या चेहऱ्यावर प्रवेश केला आणि देवीचे मुखकमल उजळून निघाले. आज वातावरण स्वच्छ असल्याने हवेतील धुणीकणांचे प्रमाण कमी होते. प्रखर सूर्यकिरणे आणि वाऱ्याची योग्य दिशा यामुळे आजचा सोहळा भाविकांना अनुभवता आला, असे किरणोत्सव अभ्यासक डॉ. मिलिंद कारंजकर, नेहा शिंदे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com