Kolhapur

कोल्हापुरातील करवीर पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेत अपहार

esakal

Kolhapur Crime News : कोल्हापुरातील करवीर पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेत अपहार, २४ कोटींचा घोटाळा उघडकीस

Cooperative Society : करवीर पंचायत कर्मचारी पतसंस्थेत २४ कोटींचा घोटाळा उघडकीस आला. संबंधित अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला असून आर्थिक गफलत आणि संशयितांचा तपशील उघड करत आहेत.
Published on
Summary

हायलाइट्स (मुख्य मुद्दे)

पतसंस्थेत मोठा अपहार: करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेत १३ कोटी २८ लाखांचा अपहार झाल्याचा गुन्हा लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात नोंदवला. आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास देण्यात आला.

फेर लेखापरीक्षणात रक्कम वाढली: जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून झालेल्या फेर लेखापरीक्षणात अपहाराची रक्कम २४ कोटी ६९ लाखांवर पोहोचल्याचे स्पष्ट झाले.

संपूर्ण कारवाई आणि गुन्हेगारांची माहिती: पतसंस्थेतील ३४ जणांवर गुन्हा दाखल झाला असून, ४४८ ठेवीदारांचे एकूण २४ कोटी ६९ लाख ५३ हजार रुपये फसवले गेले; यासोबतच ५६ ठेवीदारांनी ग्राहक न्यायालयात दावे दाखल केले आहेत.

Karveer Taluka Panchayat Samiti : करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेत १३ कोटी २८ लाखांचा अपहार झाल्याचा गुन्हा लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दाखल होता. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हा उपनिबंधक सरकारी संस्था कार्यालयाकडून झालेल्या फेर लेखापरीक्षणात अपहाराचा आकडा २४ कोटी ६९ लाख रुपयांच्या घरात पोहोचला आहे. हा अहवाल आर्थिक गुन्हे शाखेकडे पाठविण्यात आल्याची माहिती फिर्यादी सुबराव रामचंद्र पवार यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com