कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खेलो इंडिया यूथ स्पर्धा लांबणीवर | Kolhapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

khelo india youth games

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खेलो इंडिया यूथ स्पर्धा लांबणीवर

कोल्हापूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा (third wave of corona)वाढता प्रभाव व ओमिक्रॉन(omicron) या नवीन विषाणूचा वाढता संसर्ग यामुळे तयारी करूनही खेळाडूंच्‍या आशेवर पुन्हा एकदा पाणी फिरले आहे. फेब्रुवारीत होणाऱ्या खेलो इंडिया यूथ गेम्स (khelo india youth games)पुढे ढकलल्या असून, पुढील सूचना येईपर्यंत स्पर्धा स्थगित केल्या आहेत.

हेही वाचा: कोल्हापूर : एसटीचे खासगीकरण सुसाट

खेलो इंडिया यूथ गेम्सचा चौथा हंगाम फेब्रुवारीमध्ये पंचकुल (हरियाणा) येथे होणार होता. मात्र या स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित केल्या आहेत. या स्पर्धेत १७ वर्षांखालील व २१ वर्षांखालील अशा दोन वेगवेगळ्या गटांत स्पर्धा होतात. या स्पर्धेत महाराष्ट्र संघातून खेळणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याच्या खेळाडूंचा सहभाग मोठा असतो.

हेही वाचा: उद्योगधंद्याबाबत सरकारला देणेघेणेच नाही; शासनावर आवाडे नाराज

युनिव्हर्सिटी गेम्स अनिश्चितेत

दोन वर्षे मैदान बंद होऊनही उमेद न हरलेल्या खेळाडूंसाठी पुन्हा मैदाने आणि स्पर्धा स्थगित होणे हे धक्कादायक आहे. अनेक महिन्यांपासून या स्पर्धेची तयारी करीत असलेले खेळाडू या निर्णयामुळे निराश झाले आहेत. त्यातच मैदाने बंद केल्याने सराव थांबला आहे. यूथ गेम्सपाठोपाठ होणारे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स(khelo india university games) अनिश्चिततेच्या गर्तेत आहेत. स्पर्धा मार्चमध्ये कर्नाटकमध्ये घेण्याची तयारी सुरू होती.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे(third wave of corona) स्वास्थ्य मंत्रालयाच्या (Ministry of Health)सूचनेनुसार शासनाने हा निर्णय घेतला आहे. स्पर्धा स्थगित केल्या असल्या, तरीही रद्द झाल्या नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच स्पर्धेची घोषणा केली जाणार आहे.

- डॉ. चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडा अधिकारी

Web Title: Khelo India Youth Tournament Postponed Due To Increasing Corona Third Wave Omicron In Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top