कोल्हापूर : बारा तासांत साकारली तब्बल १५८ चित्रे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर : बारा तासांत साकारली तब्बल १५८ चित्रे

कोल्हापूर : बारा तासांत साकारली तब्बल १५८ चित्रे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर ः येथील सृष्टी इंगळे हिने आज बारा तासांत बॉलपेनच्या साहाय्याने तब्बल १५८ चित्रे साकारली. या उपक्रमाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याची माहिती सृष्टी आणि तिचे वडील संदीप इंगळे यांनी दिली. येथील हॉटेल पर्लमध्ये सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत हा उपक्रम झाला.

सृष्टी होलिक्रॉस कॉन्व्हेन्ट स्कूलची माजी विद्यार्थिनी असून नुकतेच तिने केआयटी कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. बॉलपेन स्केचिंगचा तिला पहिल्यापासून छंद. ज्येष्ठ चित्रकार विलास बकरे यांचे तिला मार्गदर्शन मिळाले. कोरोनामुळे जाहीर झालेल्या लॉकडाउनच्या काळात तिचा हा छंद आणखी व्यापक झाला आणि अनेक कलाकृती तिने साकारल्या. याचदरम्यान तिने बॉलपेन स्केचिंगमध्ये लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसाठी करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर वडील संदीप व आई वीणा इंगळे यांनी परवानगी दिली.

हेही वाचा: संसदेपर्यंत ट्रॅक्टर मार्च निघणारच; अजून मागण्या बाकी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता रोहित बांदिवडेकर, प्राचार्य अजय दळवी, सुरेश पोतदार, किशोर पुरेकर, मिलिंद बारापात्रे, संदीप दावणे यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले. ‘यू-ट्यूब’ वरून या उपक्रमाचे लाईव्ह प्रसारण झाले. दळवीज् आर्टस् इन्स्टिट्यूट, कलानिकेतन महाविद्यालयाचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. दरम्यान, संदीप इंगळे इंडो-स्पार्क कन्स्ट्रक्शनचे संचालक असून कंपनीच्या कुशल तंत्रज्ञांनी २०१५ मध्ये ३८ मिनिटे आणि १९ सेकंदात एक हजार २१ रिबरिंगचे लिम्का बुक रेकॉर्ड केले होते.]

"कोणत्याही कलेचा विकास हा सातत्याने होत असतो. नव्या पिढीला अशा कलांची माहिती व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम केला. बारा तासात शंभर चित्रांचे उद्दीष्ट होते. पण, १५८ चित्रे पूर्ण केली."

- सृष्टी इंगळे

loading image
go to top