कोल्हापूर : एप्रिल महिन्यापासूनचे वाढीव वीजदर मागे घ्यावेत. लॉकडाउन काळातील दर महिना 200 युनिट वीजबिल माफ करावे, अशी मागणी आम आदमी पार्टीने विविध आंदोलनांच्या माध्यमातून केली होती; परंतु राज्य शासनाने यावर अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्यामुळे आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून "मी लाईटबिल भरणार नाही; तुम्हीपण भरू नका', अशा आशयाचे स्टिकर्स लावण्याची मोहीम आम आदमी पार्टीने सुरू केली आहे.
मोहिमेद्वारे शहरातील सर्व 81 प्रभागात स्टिकर्स लावले जात आहेत. या माध्यमातून पार्टीने मिस्ड कॉल नंबर जाहीर करून पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. "आप'च्या वतीने वीज दरवाढीचा मुद्दा सातत्याने लावून धरला गेला आहे. निवेदने, विजबिलांची होळी, धरणे आंदोलन, मिस्ड कॉल मोहीम, पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या, महावितरणला टाळेठोक असे आंदोलनाचे टप्पे पूर्ण होऊन देखील राज्य सरकारने नागरिकांच्या रोषाची दखल घेतली गेलेली नाही.
हे पण वाचा - इतिहासात प्रथमच जोतिबाचा जागर झाला भाविकांविना
27 तारखेला होणाऱ्या सर्वपक्षीय टाळेठोक आंदोलनात "आप' सामील होणार असून पार्टीतर्फे नागरिकांना धीर देण्याच्या हेतूने ही मोहीम राबवत असल्याचे 'आप'चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, उत्तम पाटील यांनी सांगितले.
संपादन - धनाजी सुर्वे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.