Minor Driving Accident Kolhapur : जोरात वाहन चालवण्याची खुमखुमी, अल्पवयीन पोरानं थेट दुचाकीने आजोबांना उडवलं, मुलासह वडिलांवर गुन्हा

bike accident elderly death : कोल्हापूरमध्ये अल्पवयीन मुलाने वेगात दुचाकी चालवत आजोबांना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुलासह वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Minor Driving Accident panhala Kolhapur

Minor Driving Accident panhala Kolhapur

esakal

Updated on

Kolhapur accident news : (राजन दळवी) : पन्हाळा तालुक्यातील सातार्डे येथे अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात चालवलवत दुचाकीने दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या आनंदा बापू नाईक (वय ७०, रा. सातार्डे) या वृद्धाचा उपचारदरम्यान मृत्यू झाल्याने या प्रकरणी राजेंद्र सदाशिव नाईक (वय ३८, रा. असंडोली, ता. गगनबावडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दगडू वसंत हांडे (वय ४४, रा. सातार्डे, ता. पन्हाळा) व त्यांचा चालक अल्पवयीन मुलगा या दोघांवर पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com