

Kolhapur Accident
esakal
Kolhapur Road Accident : कामावरून घरी परतत असताना डंपरने दिलेल्या धडकेत सुश्मिता धोंडिराम पाटील (वय ३८, रा. वडणगे) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. जुना बुधवार पेठेतील भगतसिंग तरुण मंडळाजवळ काल (ता.१३) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी डंपरचालक योगेश गोविंद खुटाळे (वय ३५, रा. शिये, ता. करवीर) याला ताब्यात घेतले.