

कोल्हापुरातील पुलाची शिरोली येथे स्मशानभूमीत अघोरी कृत्याचा प्रकार समोर आला आहे.
esakal
Kolhapur Gram Panchayat cremation ground Kannada conversation : (युवराज पाटील) : शिरोली पुलाची येथील स्मशानभूमीत रात्रीच्या वेळी घडलेला कथित भानामतीचा आणि आघोरी विधीचा प्रकार सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती स्वतःला मांत्रिक म्हणवत हातात लिंबू घेऊन काही नागरिकांची नावे घेत असल्याचे दिसते. तो स्मशानभूमीत शवदाहिनीवर इकडे तिकडे फिरत काही धार्मिक व गूढ प्रकार करताना दिसतो. त्यानंतर त्याने “येथील भूत बाटलीत बंद केले आहे” असा दावा करत, त्याचा फोटोही व्हायरल केला आहे. हा प्रकार केवळ अंधश्रद्धेचा नमुना असून, प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.