

कोल्हापुरात मोठ्या विमानांच्या उड्डाणात १८ वीज टॉवरचे अडथळे, कारवाई होणार
esakal
Kolhapur Airport : विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, धावपट्टीवर मोठ्या विमानांच्या उड्डाणासाठी आणि उतरण्यासाठी विमातळ परिसरातील अडथळे काढणे आवश्यक आहे. त्यासाठी आराखडा बनविला असून, यामध्ये एकूण ८१ अडथळे आहेत. त्यामध्ये विजेचे १८ मोठे टॉवर आहेत. तसेच झाडे, अतिक्रमण केलेली बांधकामे यांचा समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली जाणार आहे. यामुळे देशातील अन्य राज्यांशी जोडणारी मोठी विमाने विमातळावर येण्यास साहाय्य होईल.