कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडिंग सुरू होणार ; धनंजय महाडिक

विस्तारित धावपट्टीस मंजुरी
 धनंजय महाडिक
धनंजय महाडिकsakal

कोल्हापूर : आता कोल्हापूर विमानतळ रात्रीसुद्धा सुरू राहणार आहे. कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडिंग आणि विस्तारित धावपट्टीला नागरी विमान उड्डाण प्राधिकरणाने मंजुरी दिली. त्यामुळे दीर्घकाळ रेंगाळलेला आणि सातत्याने चर्चेत असलेले दोन्ही प्रश्‍न सुटल्याचेही ते म्हणाले.

त्यांनी या निर्णयांबाबत दिलेली माहिती अशी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून कोल्हापूरसाठी दोन महत्त्वाच्या योजनांना मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडिंग सुविधेला मंजुरी मिळाली. धावपट्टी १३७० वरून १९३० मीटर इतकी विस्तारित झाली आहे. त्यामुळे आता एअरबससारखी मोठी विमाने येथील विमानतळावर उतरू शकतील. विस्तारित धावपट्टीलाही भारतीय नागरी विमान उड्डाण प्राधिकरणाने मान्यता दिली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, गेल्या आठवड्यात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली. विमानतळाच्या गरजांची माहिती दिली. त्यावेळी शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. ‘ऍपरन’ आणि ‘टॅक्सी वे’ तसेच ‘आयसोलेशन वे’ उभारण्यास तत्काळ मंजुरी दिली होती. त्याबाबतचा पाठपुरावाही सुरू ठेवला होता. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही येथील विमानतळाचे प्रश्‍न सुटावेत, यासाठी प्रयत्न केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचेही मार्गदर्शन मिळाले. या सर्वांच्या प्रयत्नातून कोल्हापूरचा महत्त्वाचा विषय मार्गी लागला आहे.

आता लवकरच कोल्हापूर - मुंबई दैनंदिन विमानसेवेसह, अन्य मार्गांवर विमान उड्डाण सुरू व्हावे, रात्रीची विमानसेवा सुरू व्हावी, कोल्हापूर विमानतळाची नवी इमारत लवकरात लवकर पूर्ण व्हावी, यासाठी प्रयत्नशील आहे.

- धनंजय महाडिक, खासदार

विमानतळ विकासाला चालना मिळेल. कोल्हापूर व शेजारील जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल. या सुविधांसाठी ज्योतिरादित्य शिंदे व धनंजय महाडिक यांचे योगदान महत्त्वाचे.

- ललित गांधी, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com