

Protest Erupts at Kolhapur Airport Villagers Try to Enter Through Main Gate
Esakal
कोल्हापूर विमानतळाजवळचा उजळाईवाडी-नेर्ली-तामगाव हा रस्ता बंद केल्याने नेर्ली व तासगाव (तामगाव) येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. प्रशासनाने रस्ता बंद करून पर्यायी रस्ताचे काम न केल्याने नागरिकांना खूप हाल होतआहेत. विमानतळाची सुरक्षा आणि विस्तारीकरण यामुळे हा रस्ता बंद करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. हा रस्ता बंद केल्यानं दोन्ही गावच्या ग्रामस्थांना दहा किलोमीटर फिरून जावं लागत आहे. पर्यायी रस्ता सुरू होत नाही तोपर्यंत सध्याचा रस्ता सुरू करून द्या अशी मागणी आंदोलकांकडून केली जातेय.