कोल्‍हापूर : बानगेत धरणग्रस्तांना जमिनीचे वाटप चुकीचे

आदेश रद्द करण्याची मागणी कुटुंब जनावरांसह उपोषणाचा इशारा
काळम्मावाडी धरणग्रस्त
काळम्मावाडी धरणग्रस्त sakal

म्हाकवे : बानगे कागल येथील काळम्मावाडी धरणग्रस्त वसाहतीमधील एन.ए.असलेली ९२ गुंठे जमीन धरणग्रस्तांच्या सार्वजनिक विकासासाठी राखीव ठेवली आहे. या जमिनीतील ४० गुंठे जागा नागनवाडी प्रकल्पग्रस्तांना दिली होती. परंतु वसाहतीतील नागरिकांनी जागेचे वाटप चुकीचे असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन वाटपाचा झालेला आदेश रद्द केला होता. पुन्हा तीच जमीन संबंधित लाभार्थीला देण्याचा आदेश काढला. हा आदेश रद्द झाला नाही. तर कुटुंब जनावरांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा बानगेतील प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.

काळम्मावाडी धरणग्रस्तांची बानगे- मळगे खुर्द रस्त्यालगत वसाहत आहे. वसाहतीत १३ प्रकल्पग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन १९८३ ला झाले.काळम्मावाडी प्रकल्पात ज्यांच्या जमिनी गेल्या, अशा प्रकल्पग्रस्तांना उपजीविकेसाठी जमीन व राहण्यासाठी चार गुंठे जागा दिली. गट नंबर २२४ मधील १ हेक्टर ५६ गुंठे जमिनीपैकी ६४ गुंठे क्षेत्रात वसाहतीमधील धरणग्रस्तासाठी भूखंड तयार केले. त्यापैकी खातेदार व भूमिहीन अशा २३ धरणग्रस्तांना भूखंडाचे वाटप झाले.

भूखंडावर धरणग्रस्तांनी कायमस्वरूपी घरे बांधून ३७ वर्षे झाली. वसाहत स्थापन करतेवेळी ९२ गुंठे जमीन वसाहतीच्या भविष्याच्या उपयोगासाठी आरक्षित ठेवली आहे. खुल्या क्षेत्रात शाळा, समाजमंदिर, मैदान, सार्वजनिक शौचालय, स्मशानभूमीसाठी या जमिनीचा उपयोग करायचा आहे. असे असतानाही पुनर्वसन कार्यालयाने यापैकी ४० गुंठे जमिनीचे नागणवाडी प्रकल्पग्रस्तांना वाटप केले होते. ८ जुलै २०२१ ला आदेश झाला होता. यानंतर बानगे येथील काळाम्मावाडी प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे चुकीच्या पध्दतीने वाटप झाल्याचे निदर्शनास आणून देत तक्रार केली. त्यानंतर २० आॅगस्ट २०२१ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी तो आदेश रद्द केला. पुन्हा १६ फेब्रुवारी २०२२ रोजी त्याच प्रकल्पग्रस्तांना जमीन देण्याचा आदेश काढला आहे.

काळम्मावाडी प्रकल्पग्रस्तांना विचारात न घेता परस्पर पुनर्वसन विभागाने ही जमीन नागणवाडी प्रकल्पग्रस्तांना कशी काय दिली, असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.उपविभागीय अधिकारी राधानगरी, कागल यांच्या आदेशानुसारच बानगे तालुका कागल येथील ४० गुंठे शेतजमीन नागनवाडी प्रकल्पग्रस्तांना वाटप केली आहे. आदेशाची नियमानुसार अंमलबजावणी केली आहे.

- अरुण कांबळे, मंडल अधिकारी, केनवडे.

काळम्मावाडी प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव असणारी जमीन नागनवाडी प्रकल्पग्रस्तास देण्याचा आदेश रद्द झाला नाही, तर कुटुंब जनावरांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे. आरक्षित जमिनीचे चुकीच्या पद्धतीने वाटप होत आहे.

- विठ्ठल पाटील,धरणग्रस्त, बानगे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com