Kagal Politics : कागलचं राजकारण बदलणार? एकमेकांवर आरोप करणारे मुश्रीफ-समरजित घाटगे आले एकत्र!

कागल तालुक्यात विधानसभेवरून मुश्रीफ-समरजित यांच्यात रंगला सामना
Hasan Mushrif vs Samarjeetsingh Ghatge
Hasan Mushrif vs Samarjeetsingh Ghatgeesakal
Updated on: 
Summary

कागल तालुक्यातील सुळकुड येथून इचलकरंजीला पाणी देण्याचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच गाजत आहे.

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या चार वर्षांपासून एकमेकांसमोर ठाकलेले आणि त्यातून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणारे कागलचे नेते मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjitsingh Ghatge) पाणी प्रश्‍नावर मात्र एकत्र आल्याचे आज पाहायला मिळाले.

Hasan Mushrif vs Samarjeetsingh Ghatge
मोठी बातमी! जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी घेणाऱ्या दहशतवाद्यांना मंडणगडातील संशयितानं पुरवली आर्थिक रसद; ATS तपासात निष्पन्न

सुळकुडवरून इचलकरंजीला पाणी द्यायचे नाही, या एका प्रश्‍नावर तरी या दोन नेत्यांचे एकमत झाल्याचे आज दिसले. पक्षापेक्षा गटातटाच्या राजकारणाला महत्त्व असलेल्या कागल तालुक्यात विधानसभेवरून (Kagal Assembly Election) मुश्रीफ-समरजित असा सामना चांगलाच रंगला आहे.

२०१९ च्या निवडणुकीत कागलची जागा युतीत शिवसेनेला गेल्यानंतर अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या समरजित यांनी श्री. मुश्रीफ यांच्यासमोर चांगलेच आव्हान उभे केले होते, पण त्यात त्यांना यश मिळाले नाही. त्यानंतर खचून न जाता पुन्हा गेल्या चार वर्षांपासून समरजित नेटाने किल्ला लढवत आहेत. त्यातून त्यांनी मुश्रीफ यांना संधी मिळेल तिथे आव्हान देण्याचा प्रयत्न केला.

Hasan Mushrif vs Samarjeetsingh Ghatge
Kolhapur : हातकणंगलेत राडा; ताबूत विसर्जन मिरवणुकीत पोलिसांचा लाठीमार, जमावाच्या चेंगराचेंगरीत महिलांसह लहान मुलं जखमी

राजकारणात मुरलेल्या मुश्रीफ यांनीही त्यांना त्याच ताकदीने प्रत्युत्तर दिले आहे. याच महिन्यात राज्यात राजकीय उलथापालथ झाली आणि अनपेक्षितपणे मुश्रीफ हे भाजप सरकारमध्ये मंत्री झाले. यामुळे नाराज झालेल्या समरजित यांची चांगलीच कोंडी झाली. तथापि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मनधरणीनंतर समरजित पुन्हा सक्रिय झाले आहेत.

कागल तालुक्यातील सुळकुड येथून इचलकरंजीला पाणी देण्याचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच गाजत आहे. आतापर्यंत या योजनेबाबत थेट भूमिका मुश्रीफ यांनी घेतली नव्हती, समरजित हेदेखील यापासून सावध भूमिकेत होते.

Hasan Mushrif vs Samarjeetsingh Ghatge
महायुतीचं ठरलं! लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र लढणार; NCP च्या प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केली भूमिका

आज मुश्रीफ यांच्या पुढाकाराने या योजनेला विरोध करण्यासाठी झालेल्या बैठकीला हे दोन नेते एकत्र आले. केवळ एकत्र आले नाहीत तर या प्रश्‍नावर त्यांचे एकमतही झाले. विधानसभेत काय होईल माहिती नाही पण पाणी प्रश्‍नाने तरी या दोन नेत्यांची मने जुळली, असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. राजकीय मतभेद राहतील पण पाण्याने मात्र या दोन नेत्यांना एकाच व्यासपीठावर येण्यास भाग पाडले.

Hasan Mushrif vs Samarjeetsingh Ghatge
Satara : आधी वडिलांचं अपघाती निधन आणि आता 21 वर्षाची लेकही..; उदयनराजेंनी लिहिली हृदयद्रावक पोस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Hasan Mushrif Satej Patil Gokul election Kolhapur
Hasan Mushrif panel announcement October 8
Satej Patil vs Hasan Mushrif
Hasan Mushrif Makes Big Statement On Satej Patil Says No Contribution In Gokul Court Battle In Kolhapur
Marathi News Esakal
www.esakal.com