मोठी बातमी! जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी घेणाऱ्या दहशतवाद्यांना मंडणगडातील संशयितानं पुरवली आर्थिक रसद; ATS तपासात निष्पन्न

दोन दहशतवाद्यांनी केल्या कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यांतील जंगलात बॉम्बस्फोटाच्या चाचण्या
Anti Terrorist Squad Terrorist
Anti Terrorist Squad Terroristesakal
Summary

मोहम्मद युसूफ खान आणि मोहम्मद युसूफ अशी अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. या प्रकरणाची व्याप्ती वाढत आहे.

रत्नागिरी : दहशतवादी विरोधी पथकाने (Anti Terrorist Squad) पणदेरी (ता. मंडणगड) येथे कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेतले. हा संशयित पुणे-कोथरूड पोलिसांच्या (Pune Police) अटकेतील दोन दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवत असल्याचे एटीएसच्या तपासात पुढे आले आहे.

Anti Terrorist Squad Terrorist
डॉ. आंबेडकर कमान वादावर तोडगा निघणार? चौकशी समितीनं बेडगकरांचं ऐकून घेतलं म्हणणं, पंधरा दिवसांत देणार अहवाल

या संशयिताला अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणी कोकणातील आणखी दोघे एटीएसच्या टप्प्यात असल्याचे समजते. एटीएसने गोंदिया आणि रत्नागिरीतून दोन संशयितांना २७ जुलैला ताब्यात घेतले होते. पुणे-कोथरूड पोलिसांच्या अटकेतील दोन दहशतवाद्यांनी कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यांतील जंगलात बॉम्बस्फोटाच्या चाचण्या केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

Anti Terrorist Squad Terrorist
Pune ATS : आंबोलीच्या जंगलात स्फोटकांची चाचणी; दहशतवाद्यांना मदत करणारे स्थानिक कोण? ATS कडून 'त्या' दोघांची कसून चौकशी

राज्यात बॉम्बस्फोट घडविण्याचा त्यांचा कट होता, असेही निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सर्व सुरक्षा यंत्रणा कामाला लागल्या आहेत. स्थानिकांच्या मदतीशिवाय त्यांना हे शक्य नसल्याने अशा साथीदारांचा एटीएसला शोध होता. त्यापैकी पणदेरी (ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) येथील एकाला एटीएसने ताब्यात घेतले होते.

त्याची चौकशी केली असता, हा दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवत असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे दहशतवादी पथकाने त्याला अटक दाखविली आहे. त्याच्याकडे पैसे कुठून येतात, प्रात्यक्षिक करताना दहशतवाद्यांबरोबर कुठे-कुठे होता, याची चौकशी सुरू आहे.

Anti Terrorist Squad Terrorist
Yavateshwar Ghat : खासदार उदयनराजेंची 'ती' भावूक पोस्ट अन् यवतेश्‍‍वर घाटातील भीषण अपघाताबाबत महत्वाची अपडेट समोर

परंतु अजून त्याचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. गोंदिया येथील संशयिताने त्यांना फ्लॅट दिल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यालाही अटक केली गेली आहे. मोहम्मद युसूफ खान आणि मोहम्मद युसूफ अशी अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. या प्रकरणाची व्याप्ती वाढत असून, तपासामध्ये कोकणातील आणखी दोघांचा समावेश असल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com